गुरु नानक महाविद्यालयात रंगला संविधान महोत्सव. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 9, 2020

गुरु नानक महाविद्यालयात रंगला संविधान महोत्सव.

माणदेश एक्सप्रेस न्यूज
मुंबई प्रतिनिधी : जी.टी. बी. नगर येथील गुरु नानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि  संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु नानक महाविद्यालयाच्या संविधान क्लब च्या प्रथम वर्धापन दिंना निम्मित  प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांच्या नेतृत्वा खाली  दिनांक ०२  आणि ०४ जानेवारी रोजी संविधान मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले. संविधान महोत्सवाचे उदघाटन रामदासजी आठवले केंद्रीय राज्य मंत्री सामाजिक विभाग, अविनाश म्हातेकर माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य आणि गुरु नानक वैद्यक सोसायटी च्या प्रशासिका हरभजन कौर आनंद  ह्यांच्या हस्ते झाले. ह्या प्रसंगी बोलताना त्यांनी भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकला व गुरु नानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व संविधान क्लब यांनी ह्या मोहत्सवाचे आयोजन केले या साठी त्यांचे कौतूक केले. तीन दिवस चालेल्या ह्या मोह्त्सवात   महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी संविधानावर आधारती पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, वक्तृत्व, प्रश्नोत्तरी, पोस्टर, टिकटॉक  स्पर्धा व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.  सध्याच्या तरुणाई मध्ये टिकटॉक चे वेड खूप आहे यामुळे भारतीय संविधानाच्या मूल्यांवर आधारित टिकटॉक विडिओ बनवण्याची स्पर्धा हि खास आकर्षण होती. संविधान मोहत्सवात १५० हुन अधिक विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धे मध्ये आकाश देवरे, प्रथमेश पवार आणि लक्ष्मी चौधरी हे विजयी ठरले. पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन मध्ये अलका मोटवानी - सी. एच. एम. महाविद्यालय,  वरून नायर आणि प्रेरणा तिवारी - आर.जे. महाविद्यालय, फेमीदा खान - गुरु नानक कनिष्ट महाविद्यालय हे विजयी झाले.  प्रश्नोत्तर स्पर्धा मध्ये साहिल मिश्रा व प्रतीक  सिंग - सी. एच. एम. महाविद्यालय, अंकुश पांडे व काजल बीड - गुरु नानक महाविद्यालय, शेख असिफ रजा व अहमद खान - आर.जे. महाविद्यालय  हे विजयी झाले.
 सी. एच. एम. महाविद्यालयाने संविधान मोह्त्सवात एकूण चांगली कामगिरी यामुळे संविधान करंडकाचा मान मिळवला. भारतीय संविधान हि काळाची गरज आहे व तरुणांनी संविधान समजून घेण्याची गरज आहे विद्याथ्यांना मध्ये संविधान बाबत रुची निर्माण व्हावी यासाठी राज्य शास्त्र विभाग व संविधान क्लब यांनी  संविधान महोत्सवाचे आयोजक प्राद्यापक सुमीत खरात यांनी सांगितले.No comments:

Post a Comment

Advertise