युवा डान्सिंग क्वीन' मधील ' गंगा' कडे सगळ्यांच्या नजरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

युवा डान्सिंग क्वीन' मधील ' गंगा' कडे सगळ्यांच्या नजरा.

 माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उत्कृष्ट परीक्षण आणि अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे 'झी युवा' वाहिनीवर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रंगणारी 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा आता मात्र एका वेगळ्याच उंचीला पोहोचली आहे.१४ क्वीन्सच्या जोरदार परफॉर्मन्स ने सुरू झालेलया या स्पर्धेत आता एलिमिनेशन सुरु झालंय.या सगळ्याच स्पर्धक आपला अत्यंत बेस्ट परफॉर्मन्स देत असल्यामुळे,परीक्षकांना परीक्षण करणे सुद्धा अवघड जात आहे.मात्र या सर्वांबरोबर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे या सर्व मुलींना या व्यासपीठावर घेऊन आलेली गंगा.'युवा डान्सिंग क्वीन'मधील स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना करून देणाऱ्या गंगाचा एक वेगळाच सॉग आहे.तिचे स्टाईल स्टेटमेंट असो किंवा ती मुलींना ज्या प्रमाणे प्रत्येक वेळी डिफेन्ड करत असो किंवा अद्वैत आणि गंगा यांच्यामध्ये असलेलं 'टॉम अँड जेरी'चं नातं असो,ती प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं योग्य मनोरंजन होईल हे पाहत असते.गंगा या व्यक्तीबद्दल आता सर्वांच्याच मनात असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे.गंगाचा 'युवा डान्सिंग क्वीन'मध्ये असलेला रोल अजूनही नेमका कळलेला नाही.मात्र तीच्या म्हणण्याप्रमाणे अद्वैतपेक्षा ती जास्त चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं होस्टिंग करू शकते. कारण तिनेच या कार्यक्रमावर सगळ्या मुलींना आणलं आहे त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे मुलींची माहिती देऊ शकते त्याचप्रमाणे परीक्षक सुद्धा तिच्यावर खूप खुश आहेत कारण ती उत्तम नर्तिका सुद्धा आहे.तिच्या ठसकेबाज लावणीची परीक्षकांनी सुद्धा भरपूर तारीफ केली होती.या धमाकेदार लावणीचा तिचा विडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर वायरल झालेला आहे.त्यामुळे तिने अद्वैत दादरकरसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे.उत्तम होस्ट कोण या प्रश्नावर सर्व मुलींनी गंगालाच पसंती दिली आहे.त्यामुळे आता युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत राहतो की परीक्षक गंगा ला होस्ट बनवतात हे पाहणे मजेशीर ठरेल मंचावर अवतरलेली गंगा आता नक्की कुठल्या भूमिकेत पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!


No comments:

Post a Comment

Advertise