महिला वकिलाच्या 'तोंडात ऑल आऊट लिक्विड' ओतण्याचा प्रयत्न ; आरोपीविरुद्ध गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

महिला वकिलाच्या 'तोंडात ऑल आऊट लिक्विड' ओतण्याचा प्रयत्न ; आरोपीविरुद्ध गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : तीन लाख रुपये घे आणि आमच्या बाजूने जबाब दे असे म्हणून एका महिला वकिलाच्या तोंडामध्ये ऑल आऊट लिक्विडची बाटली ओतल्याची घटणा जेल रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आरती इंद्र रेडकर व्यवसाय.वकीली (वय- ३२) रा.८०३ शिंदे चौक,सोलापूर यांना त्यांचे वकील एडवोकेट लोंढे पाटील यांनी बोलवले. तेव्हा फिर्यादी कोर्टासमोर येईल फाइव स्टार हॉटेल जवळील अपार्टमेंट मधील लोंढे पाटील यांच्या ऑफिस मध्ये आले. व त्यावेळी फिर्यादीस एडवोकेट लोंढे पाटील यांनी सांगितले की, आरोपी निखिल नेताजी भोसले (वय-३५) रा. होटगी रोड, सोलापूर हे तुला काहीतरी बोलणार आहे असे म्हणालेे.त्यावेळी आरोपी यानेे फिर्यादीला तीन लाख रुपये आणि आमच्या बाजूने जबाब दे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आरती रेडकर यांनी मला नको असे म्हणाले असता आरोपीने त्याच्या जवळील ऑल आऊट लिक्विडची छोटी बाटली काढली. व ती बाटली फिर्यादीच्या तोंडात ओतली.त्यावेळी फिर्यादीने ते लिक्विड तोंडात जाऊ दिले नाही व फिर्यादीच्या अंगावर स्कार्पवर पडले. ही घटना दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोर्टा समोरील  लोंढे पाटील यांच्या ऑफिसमध्ये घडली.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise