युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबीर. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबीर.


कल्याण प्रतिनिधी
मिलिंद जाधव : संग्राम मुरकुटे आणि स्वप्निल ग्रुप यांच्या सौजन्याने आजाराने कोणीही दगावला नाही पाहिजे या उद्देशाने  वर्षाची सुरुवात २९ डिसेंबर २०१९ रोजी  कल्याण तालुक्यातील  अडवली कोणावाडी,घोडाखडक या पाड्यांवर आरोग्य शिबिर संपन्न झाले. सद्याच्या वातावरणात बदल झाले असून  त्यामुळे आजारपणाचे प्रमाण देखील वाढले आहे.  त्यामुळे होणारे आजार आपण कशाप्रकारे टाळू शकतो यावर 
शिबिरात  डॉक्टर राहुल  पाटील यांनी जनजागृती केली त्याचबरोबर डॉक्टरांनी ई.सी.जी,  रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी ,रक्तदाब तपासणी ,स्वस्त विषयक जनजागृती व लहान-मोठ्या आजारांची तपासणी  करून  औषधे देण्यात आली. एकुण १७३ नागरिकांची  आरोग्य तपासणी  यावेळी मोफत करण्यात आली.

यावेळी युवा संस्कार संस्थेचे  संग्राम मुरकुटे ,स्वप्नील गुरप,  सोमनाथ राऊत उपस्थित होते.  यावेळी  युवा संस्कारच्या संजय मुकने,राजु मुकने, शुभांगी भेरे यांचे सहकार्य लाभले. मानवता ग्रुप, स्वागत युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था देखील सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Advertise