Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुलेंचे विचार आत्मसात कराः प्रा.विजय लोंढे, देशमुख महाविद्यालयात जयंती उत्साहात साजरी.


 
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : शिक्षणातून समाज परिवर्तन करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन प्रा. विजय शिंदे यांनी केले. आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे व श्री.प्रसाद विभुते सर यांचे शुभहस्ते अाद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.यावेळी महाविद्यालयातील माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणार्याा २४ मुलींनी कु. माधुरी देशमुख मॅडम यांच्या प्रेरणेतून मैदानावर सलगपणे २६ राऊंड पळून १० कि.मी. चे अंतर पूर्ण करत सावित्रीबाई फुले यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले. डॉ. गौतम गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले.
  प्रा.विजय शिंदे पुढे म्हणाले की, एकोणिसाव्या शतकामध्ये फुले दांम्पत्यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. तत्कालीन समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढी , परंपरा , नवस-सायास , कर्मकांडे ,अज्ञान,जातीयता,विषमता,स्पृशा - अस्पृशता, अशिक्षितपणा, केशवपन, सतीप्रथा,बालविवाह , धर्मांधता अशा अनेक चालीरीतींमध्ये देशातील संपूर्ण समाज अडकलेला होता.या काळात समाजातील स्रियांचे धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते.विशिष्ट वर्णव्यवस्थेचा पगडा लोकांच्या मनावर होता. स्रीशिक्षणास परवानगी नव्हती,ती शिकली तर समाजाचे अधःपतन होईल. अशा अनेक जाचक प्रथा स्रियांच्या गुलामीस कारणीभूत होत्या.अशा सामाजिक स्वास्थ्य हरवलेल्या काळात सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.समाजाच्या त्रासाला न जुमानता त्यांनी जोतीरावांच्या विचारांना समर्थपणे साथ दिली.महिला मंडळाची स्थापना,बालहत्या प्रतिबंधक गृह,विधवांसाठी गृह,पाणवठा खुला करुन देणे,सत्यशोधक समाज,नाभिकांचा संप,दुष्काळातील कार्य,प्लेगमधील कार्य,काव्यलेखन अशा विविध कार्यावर प्रकाश टाकून अत्यंत परखडपणे प्रा.शिंदे यांनी आपले विचार मांडून सावित्रीबाई फुले यांचे क्रांतीकारी विचार आणि कार्य आजच्या काळात आत्मसात करण्याचे आवाहन केले.
    यावेळी कु.पारसे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अापले मनोगत व्यक्त केले.आभार प्रा.गणपतराव नांगरे यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्राध्यापक,प्राध्यापिका,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies