कन्हेरचा संस्कार सरगर अबॅकस स्पर्धेत देशात अव्वल ; तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 17, 2020

कन्हेरचा संस्कार सरगर अबॅकस स्पर्धेत देशात अव्वल ; तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे :  कण्हेर  ता. माळशिरस येथील कु. संस्कार लक्ष्मण सरगर यांची नुकत्याच   चेन्नई झालेल्या   अबॅकस स्पर्धेत देशात अव्वल नंबर पटल्याने जुलैमध्ये  आता  2020 मध्ये  तैवान  येथे  होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  या निवडीबद्दल माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ त्याचा  फलटण येथे सत्कार केला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, लक्ष्मण सरगर, सचिन शेडगे  उपस्थित होते.
संस्कार  सरगर हा प्रोग्रेसीव  कॉन्व्हेंट स्कूल कोळकी ता. फलटण येथे इ. 3मध्ये  शिकत आहे. यापूर्वी राज्य लेवल अबॅकस स्पर्धा 22 सप्टेंबर  2019 ला सातारा येथे पार पडल्या. त्यामध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी त्याची नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा चेन्नई साठी निवड झाली होती. चेन्नई येथे  संपन्न झालेल्या  या स्पर्धेमध्ये 5000 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये त्याने  “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन”  हे पदक पटकावून जुलै 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सदरच्या स्पर्धा तैवान याठिकाणी संपन्न होणार आहेत. 
या खास. रणजीत निंबाळकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर  मिळवलेले यश नेत्रदीपक आहे. यानिवडी बदल माजी मंत्री आम. विजयकुमार देशमुख, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,  माळशिरसचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Advertise