अपार्टमेंट मधील गाड्यांवर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

अपार्टमेंट मधील गाड्यांवर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : अपार्टमेंट मधील गाड्यांवर दगडफेक करून गाड्यांची मोडतोड केल्याप्रकरणी तीन अनोळखी इसमांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काही अनोळखी तीन इसम एक्टिवा गाडी वर येऊन ददापुरे अपार्टमेंटमधील पार्किंग मध्ये ठेवलेल्या गाड्यांवर दगडफेक करून गाड्यांची मोडतोड केली.फिर्यादी अजहर इक्बाल अहमद फारूकी (वय-५२) रा. फ्लॅट नंबर ५ ददापूरे अपार्टमेंट मोहिते नगर,होटगी रोड, सोलापुर यांच्या अपार्टमेंटच्या परिसरात दहशत पसरून पार्किंग मध्ये लावलेले फिर्यादीचे कार व मोटार सायकलवर दगड मारून नुकसान केले. ही घटना दि. १ जानेवारी रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत आरोपींविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार टंकसाळी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise