Type Here to Get Search Results !

समाजप्रबोधनाचा प्रयत्न करणारे अहिराणी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
औरंगाबाद प्रतिनिधी : आजकाल अहिराणी गाण्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन कुमावत यांच्या 'केसावर फुगे' या गाण्याने 143M चा आकडा पार केला आहे.त्याचबरोबर विविध खानदेशातील अहिराणी भाषेतील कलाकार पुढे येऊन म्युझिक व्हिडिओची निर्मिती करत आहेत. अलीकडेच कवी अमोल पाटील लिखित जयराम मोरे प्रस्तुत 'लाव तुना प्रेमले आक्काडी' हे गाणे युट्युबवर रिलीज झाले होते.या गाण्याने 42 हजार व्ह्यूजचा आकडा पार केला आहे.नवीन चॅनेल असूनही चांगले प्रतिसाद या गाण्याला मिळतोय. नुकतंच 5 जानेवारी रोजी रांजणगाव,वाळूज एमआयडीसी या औरंगाबाद मधील ठिकाणी या गीताची शूटिंग श्याम फोटो स्टुडिओ,रत्नापिंप्री यांच्या टीम ने केली.
         कवी, गीतकार, अभिनेता,दिग्दर्शक असा प्रवास अमोल पाटील यांनी त्यांच्या या पदार्पणातील गीतातून केला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या अमोल पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उपलब्ध साधनातून हे गाणे बनवले आहे. अभिनेत्री  दिपाली भिसे, अभिनेता अमोल पाटील , वडिलांच्या भूमिकेत शिवाजी सरोदे तर आईच्या भूमिकेत लक्ष्मीबाई गादेवार  यांनी मुख्य भूमिका यात निभावली आहे.ऋषिकेश तेलंगे, समीर शेख, अर्जुन पोपळघट, प्रकाश उबाळे, सचिन राठोड, लक्ष्मीबाई धजे, प्रतिभा पाटील, संगीता काळे, आशा पाटील, अंबुदास पाटील, शांताराम पाटील हे सहाय्यक कलाकार म्हणून या गाण्यात लाभले आहे. जयराम मोरे यांनी निर्माण केलेले हे गाणं दिपक अहिरे यांनी गायले आहे. रिदम जगन नेटारे यांनी दिले असून या गाण्याची शूटिंग श्याम फोटो स्टुडिओ रत्नापिंप्री टीम मधील श्याम पाटील, अमोल भाऊ, विक्की भाऊ यांनी केली आहे. विजय वाठोरे (साहिल) नांदेड, गणेश पवार, समाधान निकम, विजय जाधव, अमोल तेलप, सुनील दरवडे, योगेश राठोड,  यांनी विशेष सहकार्य दिले. तसेच हरसवाडी तथा सोनगीर  गावातील सगळे गावकरी मंडळी, राजमाता जिजाबाई प्रा.शाळा रांजणगाव, राजमाता जिजाबाई प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल कमळापूर, सावित्रीबाई फुले विद्यालय कमळापूर, कै.हौसाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय रांजणगाव यातील सगळ्या शिक्षक तथा कर्मचारिंनी या गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सागर दाभाडे यांचे नृत्य दिग्दर्शन असणारे हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाच्या उन्मादाने आजकाल मुले शिक्षणाकडे पाठ वळवत आहेत तसं घडू नये हाच संदेश गाण्यातून दिला आहे.सध्याच्या ट्रेंडप्रमाणे या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies