बोगस विहिरीची नोंद करणाऱ्या तलाठी व कोतवालावर कायदेशीर कारवाईची मागणी करत आटपाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

बोगस विहिरीची नोंद करणाऱ्या तलाठी व कोतवालावर कायदेशीर कारवाईची मागणी करत आटपाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : बोगस विहिरीची नोंद करणाऱ्या तलाठी व कोतवाल कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी तळेवाडी येथील शेतकऱ्यांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे शंकर नामदेव शिंदे भाऊसाहेब रामू शिंदे अरुण शिंदे विठ्ठल शिंदे पांडुरंग शिंदे बाळू शिंदे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे तळेवाडी येथील गट नंबर 436 मध्ये जी दिनांक सात नोव्हेंबर 2019 रोजी तलाठी यांना एक अर्ज दिला 29 नोव्हेंबर रोजी कसली कागदपत्रे अथवा पुरावा न विहिरीची नोंद करण्यात आली नंतर भाऊसाहेब रामू शिंदे यांनी या विरोधात तक्रार केली त्याची चौकशी होऊन नोंद रद्द करण्यात आली पण दोषीवर कारवाई करण्यात आली नाही म्हणून येथील शेतकऱ्यांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे 

No comments:

Post a Comment

Advertise