स्वेरीत शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

स्वेरीत शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिनिधी : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात आठवडाभर चाललेल्या ‘शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम (एस.टी. टी.पी.)’च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे साताऱ्यातील अपट्रॉन टेक कंपनीचे संचालक आस्वाद कुलकर्णी हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
           शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्रामचे समन्वयक प्रा. महेश मठपती यांनी स्वेरीमध्ये आठवडाभर सुरु असलेल्या एस. टी. टी. पी. कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व यामुळे राज्यभरातून आलेल्या संशोधक व प्राध्यापकांना मिळविलेल्या ज्ञानाचा लेखा-जोखा मांडला. ए. आय. सी. टी. ई. कडून मॉडरॉब अंतर्गत मिळालेल्या निधीतून स्वेरी इंजिनीअरींगच्या ई.अँड टी.सी. विभागाने मायक्रोवेव लॅब अद्ययावत करण्यात आली असून त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व संशोधकांना व्हावा ह्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाचे प्रमुख पाहुणे अपट्रॉन टेकचे आस्वाद कुलकर्णी यांनी ‘प्रिंटेड सर्किट बोर्ड प्रोटोटाइप मशीन’ आणि ‘व्हेक्टर नेटवर्क एनालायझर’चे महत्व तसेच त्याचा उपयोग याबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘अँटिनाबद्दल मूलभूत माहिती पासून ते अँटेना बनवणे व तो तपासणे पर्यंतची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे कौतुक केले. तब्बल आठवडाभर चाललेल्या कार्यशाळेत एस. बी. पाटील महाविद्यालय, इंदापूर,एस.जी.यु. कोल्हापूर तसेच राज्याच्या विविध विद्यापीठातील जवळपास पन्नास विद्यार्थी व संशोधकांनी स्वेरीमध्ये चाललेल्या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. या उपक्रमासाठी बाहेरून आलेले पाहुणे, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी स्वेरीने केलेल्या पाहुणचाराचे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यशाळेबाबत आपले मनोदय व्यक्त करत स्वेरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कार्यशाळेविषयी महेश कांबळे व सिमरन मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वेरीने बाहेरून आलेले पाहुणे संशोधक व विद्यार्थ्यांची उत्तम सोय केली होती. यावेळी अपट्रॉन टेक कंपनीचे मदन कुलकर्णी, स्वेरीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.डी.एस. चौधरी व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर. पाटील यांच्यासह प्राध्यापकवर्ग देखील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.जी.जी. उन्हाळे यांनी केले तर प्रा.जे.एस. शिंदे यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment

Advertise