महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे मंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन 2020 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे मंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन 2020 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
मुंबई : दिनांक 01-01-2020 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते मा.श्री.राजाराम देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 2020 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यांचे प्रमुख उपस्थिती प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते सन 2020 या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला.

दिनदर्शिकेचं प्रकाशन केल्या नंतर माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त करतेवेळी सर्व महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व हे नववर्ष सर्व देशवासियांना सुखाचे,समाधानाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,आनंददायी व आरोग्यदायी जावो आशी मनोकामना व्यक्त केली.

या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यांसाठी मा.श्री.आशिष दुबेजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:

Post a Comment

Advertise