खानापूर पोटनिवडणूकमध्ये सुहासनानाचा बालेकिल्ला अबाधित; नगरपंचायत पोट निवडणूकमध्ये उमेश धेंडे बिनविरोध. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

खानापूर पोटनिवडणूकमध्ये सुहासनानाचा बालेकिल्ला अबाधित; नगरपंचायत पोट निवडणूकमध्ये उमेश धेंडे बिनविरोध.

 माणदेश एक्सप्रेस न्यूज 
खानापूर प्रतिंनिधी : खानापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील पोटनिवडणूकीमध्ये खानापूर जनता विकास आघाडीचे नेते मा.सुहास (नाना) शिंदे याचा बालेकिल्ला असलेला प्रभाग ७ मध्ये उमेश धेंडे याची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. ही जागा खानापूर जनता विकास आघाडीचे गटनेते कै. विजय ठोंबरे यांच्या अकस्मिक निधनाने रिक्त झाली होती.  
        प्रभाग क्र ७ मध्ये दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवार दि.१२ रोजी करण्यात आली. यामध्ये विरोधी उमेदवार  सुहास ठोंबरे यांचा उमेदवारी अर्जं अवैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी शंकर बर्गे यांनी दिली होती. त्यानुसार काल माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये एकच अर्ज उमेश धेंडे याचा राहिला. त्याच बरोबर विरोधी उमेदवाराला न्यायालयमध्ये आपिल करण्यासाठीची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय  अधिकारी यांनी उमेश धेंडे यांना बिन विरोध म्हणून विजय घोषित करण्यात आले. यावेळी त्याचा खानापूर जनता विकास आघाडीचे नेते मा.सुहास(नाना) शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात  आला.
         यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) डोंगरे, नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, माजी नगराध्यक्ष अलीअकबर पिरजादे, माजी नगराध्यक्षा सौ. भारती बबन माने, माजी उपनगराध्यक्षा सौ.स्वाती राजेंद्र टिंगरे, माजी उपनगराध्यक्षा सौ.सुनिता सदाशिव भगत,सभापती सौ.नूतन भरत टिंगरे, नगरसेविका मंगल खंडू मंडले, बबन माने, राजेंद्र टिंगरे, धनाजी कदम, भरत टिंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख धेंडे, संतोष धेंडे, राजेंद्र धेंडे, बाळासाहेब धेंडे, सुशिल लोंढे मिलिंद धेंडे, दत्तात्रय कांबळे, सुधाकर धेंडे, जबाजी धेंडे, अतुल सावंत अमोल धेंडे, योगेश धेंडे, सागर धेंडे निलेश मोरे, गणेश धेंडे, राजेश धेंडे, दिनकर कांबळे, तसेच यावेळी नानाप्रेमी कार्यकर्ते व युवक नागरिक शहरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise