चिंचाळे येथे एकास मारहाण : समाईक जागेत बांधकाम करण्यावरून वाद ; चौघावर गुन्हा दाखल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

चिंचाळे येथे एकास मारहाण : समाईक जागेत बांधकाम करण्यावरून वाद ; चौघावर गुन्हा दाखल.

आटपाडी/प्रतिनिधी : समाईक जागेत बांधकाम करण्याच्या वाडावरून चिंचाळे ता.आटपाडी येथील सर्जेराव रामा पवार (वय ४५) यांना मधुकर रामा पवार, अमोल लाल पवार, अनिल लाल पवार, सचिन मधुकर पवार  यांनी लाथाबुक्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. सदरची घटना मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री सर्जेराव पवार कुटुंबियांसोबत घरी होते. यावेळी मधुकर पवार बांधकामासाठी बांधकाम करण्याच्या उद्देशाने  खडी आणि वाळू घेऊन आले आणि खोदकाम करू लागले असता सर्जेराव यांनी आपण रितसर वाटणी करू मग बांधकाम करावे असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या मधुकर पवार आणि त्यांचे पुतणे अमोल लाला पवार, अनिल लाला पवार आणि सचिन मधुकर पवार या  चौघांनी सर्जेराव पवार यांना लाथाबुक्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गबाले करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise