राजेवाडीत महिलेचा विनयभंग. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

राजेवाडीत महिलेचा विनयभंग.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : राजेवाडी येथील 26 वर्षे महिलेचा विनयभंग झाल्याची घटना दिनांक 18 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास फिर्यादीचे घरी राजेवाडी येथे घडली. याबाबत आरोपी अक्षय बाबा बुधावले रा. राजेवाडी याच्या विरोधात कलम ३५४ (अअ), ४५२, ५०६ नुसार आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजेवाडी येथील गावंदरमळा जुने गावठाण येथे फिर्यादीचे राहते घर आहे. दि. १८ रोजी साय. ८ च्या सुमारास त्या घरात झोपलेले असताना आरोपी अक्षय बाबा बुधावले रा. राजेवाडी याने फिर्यादीच्या घरी कडी वाजवली. यावेळी फिर्यादीने कडी काढली असता आरोपीने घरात जाऊन फिर्यादीला खाली पाडून हात धरून तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करू लागला व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करू लागला. म्हणून फिर्यादीने आरोपीविरुद्ध आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार चोरमुले हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise