Type Here to Get Search Results !

मांडवे गावात संत गाडगेबाबा विभागीय समितीचे जल्लोषात स्वागत.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस प्रतिनिधी : तालुक्यातील मांडवे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असून त्याची निवड विभागासाठी झाली होती .त्यामुळे विभागस्तरीय निवड समितीने आज गावामध्ये प्रवेश करताच त्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी ढोल ताशा बरोबर लेझीम खेळत गावांमध्ये स्वागत केले. एखाद्या पाहणी समितीचे असे स्वागत पाहून कमिटी सदस्यां विभागीय उपायुक्त राजाराम झेंडे मांडवे गाव म्हणजे स्वच्छतेची पंढरी आहे. असे गौरव उद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी गावाच्या मेन रस्त्याने कमान ,रांगोळी, पाणी मारून सर्व शासकीय कार्यालय चकाचक केली गेल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी गावकऱ्याच्या वतीने आलेल्या पाहुण्याचे सत्कार कर०यात आले.
        या विभागस्तरीय कमिटी मधील विभागीय उपआयुक्त राजाराम झेंडे , भांडे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, बोंबले साहेब अधिक्षक पुणे विभाग पुणे,चांदगुडे साहेब तसेच त्यांच्या बरोबर गटविकास अधिकारी स्मिता पाटील, विस्तार अधिकारी के.व्ही. खरात,भोंडवे साहेब, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोसले, तलाठी पी जी उदगावे ग्रामस्थ सरपंच मनीषा कुमार पाटील, तानाजी पालवे , सदस्य ज्ञानदेव पाटील, शिवाजी पालवे, रामदास कर्णे,शितल दुधाळ, राहुल दुधाळ, अर्जुन दुधाळ, दिपक माने देशमुख, पोलिस पाटील नितीन सोनट्टके,अरविंद भोसले, शिवाजी गोरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies