बाजार समितीचे संचालक कुमार चव्हाण यांचा मृत्यू. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 7, 2019

बाजार समितीचे संचालक कुमार चव्हाण यांचा मृत्यू.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कुमार रावसाहेब चव्हाण वय 32 यांचा सांगली येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला. 
कुमार चव्हाण यांनाताप आल्याने उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले काल. सांगली येथे उपचार सुरू असताना निधन झाले. काल सकाळी त्यांचे पार्थिव आटपाडी येथील प्रकाशवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या मृत्यूने मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. आटपाडीतील वडार समाज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
कुमार चव्हाण यांनी आटपाडी ग्रामपंचायतीचे पाच वर्ष सदस्य म्हणून काम केले. माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील गटाचे ते कार्यकर्ते होते. प्रभाग दोन मध्ये नागरी सुविधा देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून ते आटपाडी तालुका परिसरात परिचित होते. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ते सध्या कार्यरत होते. वडार समाज संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या निधनामुळे प्रकाशवाडीवर शोककळा पसरली. अंत्यसंस्कारासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी, खेळाडू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise