धनगर आरक्षण प्रकरणी गुन्हे मागे घ्या: गोपीचंद पडळकर . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

धनगर आरक्षण प्रकरणी गुन्हे मागे घ्या: गोपीचंद पडळकर .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : राज्यात धनगर आरक्षण प्रश्नी दाखल दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
राज्यामध्ये धनगर आरक्षण प्रकरणी ठिकठिकाणी आंदोलने झाली, मोर्चे निघाले, विधानभवनामध्ये पत्रके फेकण्यात आली. यामध्ये धनगर समाजातील अनेक युवकावर शासकीय गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते सर्व गुन्हे ताबडतोप मागे घेण्यात यावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार जावून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व पहिल्यांदा आरे येथील मेट्रो कारशेड विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे त्यांनी मागे घेण्याचे आदेश दिले.
त्यानंतर राज्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीमुळे राज्यातील बुद्धिवंत व विचारवंत यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर भाजप सरकारने गुन्हे दाखल केले होते. ते सर्व गुन्हे राजकीय सूडबुद्धीने दाखल केले असल्याने ते ताबडतोप मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये व धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यामुळे आता धनगर आरक्षण प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी गोपीचंद पडळकर करणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise