पाचवे मराठी साहित्य संमेलन नाथ्रा कवींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन- डॉ.ए.घ.मुंडे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

पाचवे मराठी साहित्य संमेलन नाथ्रा कवींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन- डॉ.ए.घ.मुंडे.माणदेश एक्सप्रेस न्युज 
परळी वैजनाथ प्रतिनिधी : तालुक्यातील नाथ्रा येथे 17 ते 18 जानेवारी रोजी होणार्याप पाचव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनासाठी कवींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजक डॉ.ए.घ.मुंडे यांनी केले आहे.
नाथ्रा येथे पार पडणार्या. या ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात कवी, शाहिर, लोकगिते, कलाकार, भारुड, कथा कथन, भजन, गवळणी या सर्व प्रकाराच्या गायनासाठी परिसरातील साहित्यीक, कवी, विद्यार्थी यांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन संयोजक डॉ.ए.घ.मुंडे अध्यक्ष श्रीनाथ मानव सेवा मंडळ यानी केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीनाथ हॉस्पिटल व पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा, श्रीनाथ मानव सेवा मंडळ संपर्क कार्यालय नाथ्रा मो.नं.9850119393 या क्रमांकावर संपर्क साधावा.   

No comments:

Post a Comment

Advertise