Type Here to Get Search Results !

माणदेशी कवी बाबासाहेब कोकरे यांचा 'शब्दांचे फटकारे' कार्यक्रम विचारांना चालना देणारा : काटकर.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : माणदेशातील कवी बाबासाहेब कोकरे यांचा शब्दांचे फटकारे हा काव्यवाचन व काव्यगायनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्तगुणांना चालना देणारा आहे असे प्रतिपादन साहित्यिक अजित काटकर यांनी केले. ते सिद्धनाथ हायस्कूलच्या भागशाळा माळवाडी येथे बाबासाहेब कोकरे यांच्या शब्दांचे फटकारे या कार्यक्रमाचे वेळी बोलत होते.
काटकर पुढे म्हणाले की, वाचनाने माणूस विचारांनी प्रगल्भ होतो. थोरामोठ्यांची आत्मचरित्रे वाचनाने आपणास खुप काही शिकता येते. यावेळी बोलताना कवी बाबासाहेब कोकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व प्रकारच्या कार्यक्रमात हिरारीने सहभागी व्हावे. त्यातुन त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी झोप उडवणारी स्वप्ने पहावीत व त्यांच्या परिपूरसाठी आटोकाट प्रयत्न करावेत.
या कार्यक्रमात कवि कोकरे यांनी ' आभाळ फाटलय किती शिलाई माराल ' ' रानातला ससा, पाण्यातला मासा,' 'हात न लावता पडल उतान ' 'मुलींची वाढ रोजी नका', 'बापाने ठरवलयं,' 'ध्येय गाठायचय,' उघड्या डोळ्यांनी' अशा अनेक कवितांचे त्यांच्या खास शैलीत वाचन केले. काही कवितांचे गायनही केले. विद्यार्थानी त्यांच्या कवितांना उत्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार सचिन मठपती यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies