चिंचणी केंद्रस्तरीय क्रीड़ास्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथ शाळा, पाडळीचे यश. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 30, 2019

चिंचणी केंद्रस्तरीय क्रीड़ास्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथ शाळा, पाडळीचे यश.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
कडेगांव प्रतिनिधी : चिंचणी ता कडेगाव येथील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा पाडळीच्या विध्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनिय यश मिळविले.त्याचा गटनिहाय तपशील असा- लहान गट मुले-कबड्डी-द्वितीय क्रमांक.लहान गट मुली-कबड्डी - तृतीय क्रमांक .लहान गट गोळा फेक-विराज पवार -द्वितीय क्रमांक श्रावणी पालकर- तृतीय .लहान गट लांब उड़ी-धनराज रणदिवे - प्रथम क्रमांक.वेदांत पाटील -तृतीय .यशस्वी विद्यार्थ्यांना  जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कदम,केंद्रप्रमुख विलास शेळके व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.यशस्वी विध्यार्थ्यांना सर्वश्री गोपाल पाटसुपे,संगीता शिंगाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Advertise