जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी  मतदार यादीचा कार्यक्रम-डिसेंबर-२०१९ जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ०६-उमदी या निवडणूक विभागाचा समावेश आहे.  या निवडणुकीसाठी दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून यावर दिनांक ७ डिसेंबर २०१९ ते ११ डिसेंबर २०१९ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक – ४ ऑक्टोबर २०१९. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीकरिता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्द करण्याचा दिनांक – ७ डिसेंबर २०१९. मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक – ११ डिसेंबर २०१९. निवडणूक विभागाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख – १६ डिसेंबर २०१९. निवडणूक विभागाच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख – १६ डिसेंबर २०१९. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे – १६ डिसेंबर २०१९.

No comments:

Post a Comment

Advertise