डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 9, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पलूस/प्रतिनिधी : बिरसा क्रांती दल सांगली वतीने विटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे,  पलूस तालुका सदस्य विश्वनाथ वाळकोळी, विटा येथील राजू गागोळे, गजानन देशमुखे, रंगराव तारफे, मारूती गायकवाड आदी नागरीक उपस्थित होते.
आंबवणे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आरक्षणामुळे  आज आदिवासी बांधवांना नोकर्याा लागल्या आहेत. डॉ. बाबासाहेब नसते तर आदिवासी डोंगर,दऱ्या मध्ये दिसले असते. नोकरी लागल्यामुळे आपल्याला पैसे, गाडी, बंगला मिळाला. सध्या महाराष्ट्र सह देशात आदिवासी समाजाची अवस्था भयाण आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे खुप मोठे उपकार आहेत ते आदिवासी नोकरदारांना समजुन सागितले पाहिजे ज्या व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य  समजून सांगण्याची वेळ आली आहे. यावेळी कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise