तडवळे शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 30, 2019

तडवळे शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश.माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिंनिधी : दिनांक बावीस बारा दोन हजार एकोणीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शेटफळे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या .यामध्ये जिल्हा परिषद शाळा तडवळे शाळेने विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवले. लहान गटामध्ये अरविंद यादव व करण गिड्डे यांनी 50 मीटर व 100 मीटर धावणे व लांब उडी मध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला .तसेच कुमारी साक्षी गिड्डे व कुमारी स्वराली जगदाळे यांनी 50 मीटर व 100 मीटर धावणे यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. लांब उडी लहान गटांमध्ये अरविंद यादव याने प्रथम तर करण गिड्डे याने तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे मोठ्या गटांमध्ये कुमारी वैष्णवी मोटे हिने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक तर मुलांच्या गटांमध्ये प्रेम  कदम याने द्वितीय क्रमांक मिळवला .100 मीटर धावणे या प्रकारांमध्ये सानिका गिड्डे प्रथम तर चारशे मीटर धावणे यामध्ये सायली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला. रीले या खेळामध्ये लहान गट मुले व मुली यांनी प्रथम क्रमांक मिळविला व कबड्डी संघाने लहान-मोठ्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला. सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक श्री जगन्नाथ जाधव सर ,प्रवीण बाडसर ,सौ .तेजस्विनी गायकवाड मॅडम ,सौ. रुपाली चांडवले मॅडम ,श्रीमती कोपार्डे मॅडम, सौ. मेघा राणी महामुनी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. यानिमित्त केंद्रप्रमुख मैनाताई गायकवाड मॅडम विस्ताराधिकारी श्री म्हेत्रे साहेब  व गटशिक्षणाधिकारी श्री नायकवडी साहेब यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Advertise