हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 31, 2019

हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली : दुसरे महायुध्द अनुदानधारक माजी सैनिक / विधवा यांचे दुसरे महायुध्द अनुदान दरमहा 6 हजार रूपये एप्रिल 2018 पासून करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी नोव्हेंबर - डिसेंबर 2019 मध्ये हयातीचा दाखला बँकेव्दारे अथवा स्वत: जिल्हा सैनिक कार्यालयात जमा केलेला नाही, अशा लाभार्थ्यांनी आपल्या गावचे सरपंच/पोलीस पाटील/ नगरसेवक यांच्याकडून हयातीचे दाखले घेऊन त्यासोबत बँकेच्या पासबुकाचे पहिले व शेवटच्या प्रिंट केलेल्या पानांची व माजी सैनिक ओळखपत्र यांच्या छायाकिंत प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे दिनांक 15 जानेवारी 2020  पर्यंत जमा करावेत. अन्यथा दुसरे महायुध्द अनुदान बंद करण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सांगली यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise