बुलढाणा येथील महिलेचा खून करणाऱ्या नराधमांना फाशी द्या : वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 12, 2019

बुलढाणा येथील महिलेचा खून करणाऱ्या नराधमांना फाशी द्या : वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात 55 वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचार करून खून केलेल्या नराधमांना तातडीने अटक करून फाशी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे तहसीलदारांना निवेदन दिले. बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग महिलेवर नराधमाने अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे. हि महिला एका मेंढपाळ कुटुंबातील आहे. या घटनेचा निषेध करून हे कृत्य करणाऱ्या नराधमाला तातडीने अटक करावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जावा अशी मागणी केली आहे. यावेळी दाजी शेंडगे, समाधान पुकळे, समाधान ऐवळे, शैलेश ऐवळे, अंकुश मुढे, सचिन बुधावले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise