राष्ट्रवादी पदवीधर संध आटपाडी तालुका अध्यक्षपदी निलेश भंडारे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 30, 2019

राष्ट्रवादी पदवीधर संध आटपाडी तालुका अध्यक्षपदी निलेश भंडारे.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : राष्ट्रवादी पदवीधर संघ आटपाडी तालुका अध्यक्षपदी निलेश बाळासाहेब भंडारे (आटपाडी) यांची निवड करण्यात आली .
राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रविण डबाणे यांनी भंडारे यांची निवड केली , निलेश भंडारे यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या हस्ते  देण्यात आले तर भंडारे यांना पुष्पगुच्छ देवून प्रदेश राष्ट्रवादीचे कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी गौरविले .
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण डबाणे , जिल्हा कार्याध्यक्ष अजितसिंह जाधव विटा , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित ऐवळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मिडीया तालुका अध्यक्ष कुर्बानहुसेन खाटीक , युवा नेते समाधान नळ - भोसले दिघंची , स्वप्नील शिंदे ,राष्ट्रवादीचे सोशल मिडीया सचिव प्रफुल्ल माळी कासेगांव , अमित फडतरे  आटपाडी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise