आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न : हजारो पालकांची उपस्थिती, मुलांचे कौतुक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न : हजारो पालकांची उपस्थिती, मुलांचे कौतुक.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
 विटा प्रतिंनिधी : 14 डिसेंबर 2019 रोजी विटा येथील.मा.लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक  स्कूल स्टेट बोर्ड विटा यांचे 11 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण  समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री.अतुल पाटील साहेब -मुख्याधिकारी, विटा नगरपरिषद विटा, मा.श्री.ऋषिकेत शेळके साहेब,तहसीलदार  खानापूर तालुका, संस्थेचे संस्थापक मा.श्री अँड.सदाशिवराव (भाऊ) पाटील, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. वैभव (दादा) पाटील, मा श्री.विशाल (काका ) पाटील - चेअरमन  विराज दूध संघ विटा, कार्यकारी संचालक पी.टी.पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडला.
 या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु.सैफ सलीम शिकलगार (इ 9 वी) व आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार कु.साक्षी जगन्नाथ मनगुत्ते (इ 9 वी )यांना मिळाला व आदर्श शिक्षक पुरस्कार मा श्री.रघुनाथ पवार सर यांना मिळाला. तसेच राज्य पातळीवर चमकणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र किनगे सर व कांचन शिंदे यांनी केले . व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी मानले. संस्थेचे व आदर्श स्टेट बोर्ड या शाळेचे चे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment

Advertise