माळशिरस पंचायत समितीने अडीच वर्षात २०० कोटीचा निधी आणला : आ राम सातपुते. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

माळशिरस पंचायत समितीने अडीच वर्षात २०० कोटीचा निधी आणला : आ राम सातपुते.


माळशिरस प्रतिनिधी : माळशिरस येथील पंचायत समितीने गेल्या अडीच वर्षात राज्यात सर्वाधिक २०० कोटी रुपयांचा निधी आणून ग्रामीण विकासाला गती दिली व सहकार महर्षींचे विकासाचे स्वप्न साकार केले असे मत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले . 
माळशिरस पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या तालुक्यातील ३७ लाभारर्थ्याना नवीन विहीर , जुनी विहीर दुरुस्ती व मोटर पंपसाठी मंजूर झालेल्या  सुमारे १ कोटी ९३ लाख ६० हजार रुपयांच्या मंजुरी पत्राचे वाटप माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . त्या समारंभात आ सातपुते यांनी पंचायत समितीच्या कारभाराचे कौतुक केले .
या समारंभास शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील ,  सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील , उपसभापती किशोर सुळ , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख , सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन ॲड प्रकाश पाटील , श्री शंकर साखर कारखान्याचे व्हा चेअरमन ॲड मिलींद कुलकर्णी , माजी सभापती बाळासाहेब होले , अर्जुनसिंह मोहिते पाटील , भाजपाचे तालुकाध्यक्ष सोपान नारनवर , काका मोटे , आप्पासाहेब देशमुख , बाळासाहेब सरगर , लक्ष्मण गोरड , सचिन रणवरे , लक्ष्मण पवार , हरिभाऊ मगर , केशव कदम , विष्णूपंत केमकर ,   जि प सदस्य अरुण तोडकर , सुनंदा फुले ,  साक्षी सोरटे , लक्ष्मण भानवसे , प्रताप पाटील , मानसिंग  मोहिते , फातिमा शेख , शोभा साठे , आरती मगर , दादा ठवरे , नामदेव ठवरे , जालिंदर फुले ,  यांच्यासह सरपंच व लाभार्थी उपस्थित होते .
अॅड. प्रकाश पाटील , काका मोटे , गणपतराव वाघमोडे आदीनी आपले विचार मांडले तर आभार कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise