महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज : निलकंठ शिंदे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज : निलकंठ शिंदे.

माणदेश एक्सप्रेस न्युज  
सांगोला : सांगोल्यातील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी संघटनेच्या कार्यालयात 28 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन उद्योजक गोविंदराव माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवान करण्यात आले. 
यावेळी बोलताना संस्थापक निलकंठ शिंदे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्या विषयी माहिती देऊन महात्मा फुले यांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन युवकांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अच्युत फुले यांनी केले. कार्यक्रमास संघटनेने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise