जि.प. वाघोली शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

जि.प. वाघोली शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश.


माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/प्रतिनिधी :  वाघोली ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झालेल्या लहान गट व मोठा गट बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाघोली ता, माळशिरस, जि. सोलापूरच्या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये लंगडी मुले लहान गट विजेता. कबड्डी लहान गट मुले उपविजेता. लंगडी मुले मोठा गट विजेता. खो-खो मोठा गट मुले विजेता. खो-खो मुली मोठा गट विजेता. 200  मीटर धावणे वैयक्तिक क्रीडा प्रकारात स्नेहा संतोष पवार प्रथम क्रमांक मिळवला आहे. 
विजेत्यांना माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.नाचणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  अनिल पाटोळे यांच्या हस्ते  मेडल व ट्रॉफी प्रदान करण्यात आले.  या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे वाघोलीतील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक वर्गातून अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise