निंबवडे मधून म्हैस गेली चोरीला; अज्ञात चोरट्या विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

निंबवडे मधून म्हैस गेली चोरीला; अज्ञात चोरट्या विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : निंबवडे येथील सुशांत जगन्नाथ हेगडे व.व. २१ यांची म्हैस दि. 12 व 13 तारखेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुशांत जगन्नाथ हेगडे यांची म्हैस त्यांचे वस्तीवरील पत्र्याच्या मोकळ्या गोठ्यामध्ये रात्री बांधून ठेवली. दि. १२ च्या रात्री दि. १३ पहाटे सहाच्या दरम्यान यातील अज्ञात चोरट्यांनी म्हैशीची चोरी केली आहे. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार भोते करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise