ग्राहक जागरण जिल्हा परिक्रमेचा सर्वांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

ग्राहक जागरण जिल्हा परिक्रमेचा सर्वांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : ग्राहक पंचायत सांगली व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जागरण जिल्हा परिक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्रमेच्या माध्यमातून ग्राहक जागृती व प्रबोधन केले जाणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे ग्राहक जागरण जिल्हा परिक्रमा चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, ग्राहक पंचायत सांगलीचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, भास्करराव मोहिते, के. आर. देशपांडे, दत्ता मोहिते, प्रकाश फडके, सुनिल जोशी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या उपक्रमांतर्गत दि. 4 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत ग्राहक पंचायत सांगली व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येकी तीन गावामध्ये जाऊन ग्राहक जागृती व  प्रबोधन करणार आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध संघटनांशी चर्चा केली जाणार आहे.
यावेळी ग्राहक पंचायत सांगली यांच्या “कृषि ग्राहक राजा” या पुस्तिकेचे व माहिती अधिकार कायदा 2005 व लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 व ग्राहक चळवळ, ग्राहक पंचायत व ग्राहक संरक्षण कायदा यांच्या माहिती हस्तपत्रकांचेही प्रकाशन करण्यात आले. 
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join                                     होण्यासाठी Click करा.  No comments:

Post a Comment

Advertise