Type Here to Get Search Results !

हजारे मळा येथे स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती मोहीमेस प्रतिसाद; स्वराज्य यंगस्टर महिला ग्रुपचा लाक्षणिक सहभाग.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा/प्रतिनिधी : जारे मळा व घोडके मळा येथील रहिवाशी नागरिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती मोठ्या उत्साहात पार पडली. नागरिकांनी घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणे, त्याचबरोबर परिसर स्वच्छता, मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षण साठी विचारले जाणारे अभिप्राय चे बारा प्रश्न व  शहर स्वच्छते संदर्भातील  समस्या, १००% कचरा विलगीकरण अशा विविध विषयावरती जनजागृती कार्यशाळा यशस्वी झाली. 
यावेळी नगरपरिषदेच्यावतीने प्रतिभा जाधव यांनी महिलांशी संवाद साधत मनोगत व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती टीम प्रमुख तथा वसुंधरा पर्यावरण संस्थेचे सचिव नितीन चंदनशिवे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी वार्ड ऑफिसर सचिन गिड्डे, दत्ता मदने, सुधाकर मंडले, वसुंधरा पर्यावरण संस्थेच्या उपाध्यक्ष पल्लवी नाईक, स्वच्छ सर्वेक्षण टीम चे असलम शेख, श्रीकांत विभूते, सुरज मंडले, रोहीत पवार, केदार जावीर, स्वराज्य मिस्टर ग्रुपचे अंबिका हजारे यांच्यासह सर्व महिला व नागरिक यांची उपस्थिती लक्षणिक होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies