खडवली येथे दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 30, 2019

खडवली येथे दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.


भिवंडी प्रतिनिधी 
मिलिंद जाधव : धम्मकाया  फाऊन्डेशन  व धम्मकाया फेडरेशन  ''एक विश्व बौद्ध मिशन'' यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील विपश्यना सेंटर  लगतच  असलेल्या केणे फार्म हाऊस येथे  दिनांक २८ ते २९  डिसेंबर २०१९  रोजी दोन दिवसीय  धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे उद्घाटन धम्मकाया फाऊन्डेशनचे  संस्थापक अध्यक्ष  प्रवीण पंडित  व  धम्मकाया फेडरेशनचे अध्यक्ष  भीमराव घनसावंत  यांच्या हस्ते करण्यात आले.
''मैत्री व करुणा भावनेचे समाज जीवनात होणारे लाभ''  या विषयावर  धम्मकाया फाऊन्डेशनचे  संस्थापक अध्यक्ष  प्रवीण पंडित यांनी मार्गदर्शन केले.  प्रशिक्षण म्हणजे काय? धम्म प्रशिक्षणाची आवश्यकता, धम्मपद , धम्माचरणात श्रद्धेचे महत्व या विषयावर  सुमित भालेराव यांनी मार्गदर्शन केले. परियत्ती, पटिपत्ती, पटीवेदन म्हणजे काय, संघटनात्मक विषयावर ,भीमराव घनसावंत यांनी मार्गदर्शन केले. धम्मकाया फाऊन्डेशन व  धम्मकाया फेडरेशनचा परीचय,  धम्मकाया एक विश्व बौद्ध  मिशन, बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर प्रवीण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. धम्म प्रचारकाला इतिहासाची समज असणे आवश्यक याबाबत सचिन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सब्बदानं धम्मदानं जिनाती, त्रिरत्न ( बुद्ध, धम्म , संघ ) या विषयवार माधुरी भालेराव यांनी मार्गदर्शन केले. पाली साहित्य व त्यांचा परिचय याबाबत जितेश मनोहर यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचायला सांगितलेली पाच पुस्तके बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध की कार्ल मार्क्स, मिलिंद प्रश्न, क्रांती  आणि प्रतिक्रांती , धम्मपद  या पुस्तकावर प्रवीण  गायकवाड, अनंता पंडीत, रवी अंभोरे, आविष्कार दोंदे सुमित भालेराव यांनी मार्गदर्शन केले. तर  यावेळी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान ध्यान करण्यात आले. यावेळी  विविध ठिकाणाहून नागरिकांनी गर्दी केली होती. दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिरातील अनुभव यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या मनोगतातून  व्यक केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी  कार्यक्रमाचे आयोजक  आविष्कार दोंदे, अनंता पंडित यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment

Advertise