राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फडणवीसांचा जाहीर निषेध. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फडणवीसांचा जाहीर निषेध.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
अकलूज : महाराष्ट्रातील महामानवाची नावे मंत्र्यांनी शपथविधीला घेतली होती. त्याला विरोध करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकलूज येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. त्यांची नावे ही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना, सरकार मधील मंत्र्यांनी त्यांचा आपल्या शपथविधी प्रसंगी उल्लेख केल्यामुळे त्यांचा उल्लेख का केला असा आक्षेप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानभवनात घेतला, ही गोष्ट या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालण्यासरखी आहे. म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी फक्त निवडणुकीत मत मागण्यासाठीच ह्या महामानवाच्या नावाचा उपयोग केला असल्याचे सिद्ध होत आहे.
भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या महामानवाना विरोध असल्याने स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केल्याच्या प्रकरणाला विरोध करणाऱ्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise