मनाने दिव्यांग होऊ नका : स्मिता पाटील . तरंगफळ येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वृक्षारोपण ; विद्यार्थ्याचे विशेष सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 4, 2019

मनाने दिव्यांग होऊ नका : स्मिता पाटील . तरंगफळ येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वृक्षारोपण ; विद्यार्थ्याचे विशेष सत्कार.

माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : दिव्यांग म्हणजे दैवीअंग असलेली शक्ती. शरीरावर व्यंगत्व येणे हे नियतीच्या आधीन आहे. या व्यंगावर मात करून अनेकांनी आदर्श निर्माण केलेले आहेत. मात्र माणूस मनाने अपंग झाला तर तो आयुष्यात काहीही करू शकत नाही यामुळे प्रत्येकाने मनाने अपंग होता कामा नये. असे मत गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केळे. 
यावेळी सोलापूर टॅलेंट म्हणून प्रसिद्ध असणारा तनवीर पात्रो व व दोन्ही हात नसताना  पायाने लिहून चांगली गुणवत्ता मिळवणाऱ्या सुरज मुलाणी या   विद्यार्थ्याचे विशेष सत्कार करून त्यांना बक्षीस देण्यात आली.
तरंगफळ येथे गेली २७ वर्षाची 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग  दिन म्हणून साजरा करण्यात आला. ५९ व्या जागतिक अपंग दिव्यांग दिनानिमित्त स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील बहुउद्देशीय अपंग विकास संस्था तरंगफळ तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन माळशिरस यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात  स्वागत गीताने करण्यात आली. त्र दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील होते. यावेळी प्रमुख प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला तसेच वृक्षारोपण, अपंग बांधवांना मदत व शालेय विद्यार्थ्यांना वही-पेन व खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. शांतीलाल तरंगे यांनी केले. तर दादासाहेब हुलगे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जि.प. सदस्या सोलापूर शितलदेवी मोहिते-पाटील, बँक ऑफ इंडियाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील गावडे, पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे,  राहुल झुंजुरडे, ग्रामसेवक संतोष पानसरे, सरपंच माऊली कांबळे, गोरख जानकर, आप्पा गोरड, तुकाराम तरंगे, जयंतलाल तरंगे, अशपाक मुलाणी, आदर्श पुरस्कार, तनवीर उराडे, अपंग बांधव शालेय विद्यार्थी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise