राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ.
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे : रेडे  गावाला  मंजूर झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर रक्कम 99.70 लक्ष रुपये या योजनेचे भूमीपूजन पंचायत समिती सदस्य अर्जुनसिह मोहिते पाटील व उपसभापती किशोर सूळ यांच्या हस्ते  करण्यात आला. या वेळी शिवामृत दूध संघांचे संचालक सचिन ननवरे,  अरविंद भोसले,  पाणीपुरवठा उपअभियंता मंडलिक साहेब, बाबर साहेब, भूमकर साहेब, रेडे सरपंच मनोज दडस, माजी सरपंच बाबुराव शेंडगे, माजी सरपंच कैलास पाटील, माजी उपसरपंच नंदू बर्वे, ब्रम्हदेव शेंडगे, भाऊ शेंडगे, निवृत्ती कुंभार, हनुमंत शेंडगे ग्रामसेवक रूपनवर  व रेडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise