वरकुटे-मलवडीत गुरुचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ श्री दत्तजयंती सोहळा ; वरकुटे येथे गाणगापूर ; विविध स्पर्धेंचे आयोजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 4, 2019

वरकुटे-मलवडीत गुरुचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ श्री दत्तजयंती सोहळा ; वरकुटे येथे गाणगापूर ; विविध स्पर्धेंचे आयोजन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
वरकुटे-मलवडी/वार्ताहर : श्री.संत नामदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वरकुटे-मलवडी येथे राज प्रोसेस अँन्ड इंडस्ट्रीजच्या सौजन्याने निर्माण झालेल्या भव्य श्री. दत्त मंदिर या ठिकाणी दत्तजयंतीच्या  सोहळ्यानिमित्त मार्गशीर्ष शु.८ शके १९४१ बुधवार दि.४/१२/२०१९ ते मार्गशीर्ष शु.१४ शके १९४१ बुधवार दि.११/१२/२०१९ अखेर 'गुरुचरित्र पारायण सोहळा' आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये सप्ताहात दररोज सकाळी ८ ते १०:३० व दुपारी ३ ते ४:३० वा श्री गुरुचरित्र वाचन व सायंकाळी ६ ते ७:३० हरिपाठ, तर पहाटे ४:३० ते ६ वा काकडा आरतीचे नियोजन केले आहे. तसेच इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. सोमवार दि. ९ रोजी सकाळी ९:३० ते ११:३० वा. वसंत शिष्यवृत्ती स्पर्धा, १२ ते १:३० वा. लहान मुलांच्या गटासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि मंगळवार दि.१० रोजी सकाळी ९ ते ५ मोठ्या मुलांच्या गटासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी आकर्षक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. बुधवार दि.११ रोजी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत ७:३० ते १०:३० वा. भव्यदिव्य असा पालखी सोहळा (नगर प्रदक्षिणा) होणार असून,११ ते १२ या वेळेत प्रवचन होणार आहे. श्री दत्तजयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविकांना दुपारी १२:३० ते ३ वाजेपर्यंत वसंतराव एकनाथ पिसे (गुरुजी) यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दत्तजयंतीच्या सोहळ्यासाठी वरकुटे-मलवडी ते दत्तमंदिर जाण्या-येण्यासाठी मोफत वाहनसेवा ठेवली असून वरकुटे मलवडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, शेनवडी आदी गावच्या पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन दत्त उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise