बिरसा क्रांती दलाची राज्यस्तरीय बैठक संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

बिरसा क्रांती दलाची राज्यस्तरीय बैठक संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पलूस/प्रतिनिधी : बिरसा क्रांती दलाची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात संपन्न झाली. यावेळी बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक दशरथ मडावी यांनी मार्गदर्शन केले.
मडावी म्हणाले बिरसा मुंडा यांना भारतातरत्न देण्यासाठी लढा उभारला पाहिजे. दिल्ली येथे संसदे बाहेर ठराविक महामहानवाचे पुतळे आहेत त्यामध्ये बिरसा मुंडा पुतळा उभारला आहे. बिरसा क्रांती दल हे सांस्कृतिक सामाजिक न्यायालयीन पातळीवर काम करत आहे. संस्कृती विसरत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांचे विचार संपवत आहेत हे संपवण्यासाठी एक व्यवस्था काम करीत आहे. महादेव हे आपले पूर्वज आहेत देवांचे विरोधक आपण होतो. दास असुर असे त्यांना संभवतात. समाजाला गुलाम करायचे असेल तर साधे सूत्र आहे, संस्कृती नष्ट करा, नाईकला खलनायक करा. अशी साधी सूत्रे वापरले जातात. त्यासाठी आपली संस्कृती जपली पाहिजे. त्यामुळे माणसांमध्ये आत्मसन्मान, अभिमान, स्वाभिमान उभा होईल. महाराष्ट्रात 20 लाख नोकऱ्यांमध्ये सात टक्के आरक्षण इतक्या नोकऱ्या आदिवासी समाजाला पाहिजेत. महाराष्ट्रात आदिवासींची संख्या एक कोटी दहा लाख आहे. सहारा विमानतळासाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या मोबदला खूप कमी दिला असे मडावी म्हणाले. 
यावेळी राज्य महासचिव प्रमोद घोडाम, राज्य उपाध्यक्ष दिनेश आंबुरे, राज्य सचिव रंगराव काळे, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, कोकण विभागीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज पावरा, विदर्भ प्रमुख अतुल कोवे, यवतमाळ महासचिव प्रफुल कोवे, अमरावती जिल्हाध्यक्ष मारुती उईके, राजगुरुनगर तालुका अध्यक्ष रोहित सुपे, तालुकाध्यक्ष तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, उपाध्यक्ष तानाजी भोकटे, तालुका सहसचिव  जालिंदर किरवे  व नागपूर, अमरावती, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सांगली, वाशिम, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व जिल्हा महासचिव उपस्थित होते.
यावेळी दशरथ मडावी यांच्या हस्ते  संघटनेच्या नवीन नियुक्त्या  दिल्या.  राज्य संघटक  बाळकृष्ण मते,  राज्य  उपाध्यक्ष विजय आढारी,  पुणे जिल्हा उपाध्यक्ष  संजय मेमाणे, राजगुरुनगर तालुका सचिव शशिकांत आढारी, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले महिला तालुकाध्यक्ष सौ. डाँली डगळे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष हरिदास लोहकरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष संपत रोंगटे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर साबरे यांना नियुक्त देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Advertise