स्वेरीमध्ये आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या ज्योत रॅलीचे स्वागत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

स्वेरीमध्ये आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या ज्योत रॅलीचे स्वागत.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : दि. येत्या २६ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान २३ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ ‘क्रीडा महोस्तव-२०१९ आयोजित करण्यात आलेला असून या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या वतीने क्रीडाज्योतीचे आयोजन करण्यात आलेले होते. ही क्रीडाज्योत सर्व महाविद्यालयांतून फिरवली जाणार आहे. स्वेरीत या  क्रीडाज्योत रॅलीचे भव्य स्वागत  करण्यात आले.
आजच्या युवकांमध्ये खेळाविषयी जनजागृती व्हावी तसेच खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयात ही ज्योत फिरवण्यात येत असून या ज्योतीचे स्वेरीमध्ये आगमन झाले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,  महाविद्यालयातील खेळाडू व विद्यार्थी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीमध्ये विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. सचिन गायकवाड, सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे,  स्वेरीचे विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, स्वेरी संचलित बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ.रणजीत गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.धनंजय चौधरी, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, विभागप्रमुख, क्रीडाशिक्षक प्रा.रामेश्वर सोळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाच्या रॅलीमध्ये धावणाऱ्या खेळाडूंना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या रॅलीद्वारे आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, सोशल माध्यमांचा वापर व त्यातून खेळाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालेली मानसिकता याविषयी प्रामुख्याने मार्गदर्शन केले जात आहे. सदर ज्योत स्वेरीच्या कॅम्पसमध्ये फिरवण्यात आली. त्यानंतर ही रॅली दुसऱ्या महाविद्यालयांकडे रवाना झाली.

No comments:

Post a Comment

Advertise