साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 9, 2019

साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज.


           
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : सध्या सतत बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या मार्फत उपायोजना सुरु आहे. या साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागरण व उपायोजना मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. माळशिरस तालुक्यातील सर्व गावात एकाच दिवशी 10 डिसेंबर रोजी उपायोजना व जनजागरण करण्यात येणार आहे. गावातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, बचत गटाचे सदस्य यांच्यामार्फत गावात कंटेनर सर्वेक्षण, कोरडा दिवस जनजागृती, वापरण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे, कंटेनर रिकामे करून घासून परत भरणे, परिसरातील जुने टायर नष्ट करणे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक बाटल्या नष्ट करणे तसेच शोषखड्डे बाबत गावागावात जनजागरण, गावात वाहनावर स्पीकर लावून उपाययोजना बाबत जनजागृती, गावातील शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी काढून जनजागृती करणे, साठलेले पाणी व गटारी वाहते करणे, जळके ऑईल टाकणे, पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करणे,  गावातील नळपाणीपुरवठा योजनेची नळ  गळती काढावी अशा प्रकारे उपायोजना करण्यात येणार आहेत. 
यावेळी विविध कर्मचाऱ्या सोबत गावातील नागरीकांनी आपआपल्या गावात आरोग्य विषयक काळजी घ्यावी व विषाणूजन्य ताप  साथीच्या आजारावर  नियंत्रण आण्यासाठी तालुक्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायतीमध्ये १० डिसेंबर रोजी आरोग्य अभियानात  उपस्थित राहून उपाय योजना व जनजागृती  करण्याचे आव्हान  गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Advertise