Type Here to Get Search Results !

स्वेरीत प्रत्येक उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद : ‘सारेगम’ लिटील चॅम्पचे पद्मनाभ गायकवाड; स्वेरीत बीट्स २०१९ चे थाटात उदघाटन.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिंनिधी : ‘मी साधारण नऊ वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळी आणि आजचा उत्साह, उर्जा  पाहता  येथील कलावंताना मिळणारा प्रतिसाद कमी झाला नाही. राज्यात सर्वत्र गायनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम केले परंतु एवढा प्रचंड प्रतिसाद अद्यापपर्यंत कुठेही मिळाला नाही. खरंच स्वेरीमधून प्रत्येक उपक्रमांचा आदर केला जातो हे दिसून येते. बीट्स सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाना वाव मिळतो.’ असे प्रतिपादन ‘सारेगम’ लिटील चॅम्पचे प्रसिद्ध गायक, संगीतकार, कम्पोझर व अभिनेता पद्मनाभ गायकवाड यांनी केले.
          येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या व कलागुणांची मुक्त उधळण असलेल्या ‘बीट्स २०१९-२०२०’ या स्नेहसंमेलनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  स्वेरीचे माजी विद्यार्थी असलेले हिल्ट इंडिया प्रा. लिमी.चे राष्ट्रीय प्रमुख आनंद रेपाळ  हे होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आनंद रेपाळ म्हणाले की, ‘१९९९ ते २००२ पर्यंत मी या ठिकाणी शिक्षण घेतले. त्यावेळी रोंगे सरांनी घालून दिलेल्या ‘हार्ड वर्क’च्या सवयीमुळे मला आज माझ्या कंपनीच्याचे नेतृत्व करताना शेकडो लोकांच्या मुलाखती घ्याव्या लागतात त्यावेळी येथील मिळालेल्या शिक्षणाचा व शिस्तीचा फायदा होतो. त्यामुळे कोणतेही काम अवघड वाटत नाही. अशक्य असे काहीच जाणवत नाही कारण ‘हार्ड वर्क’मुळे अवघड कार्य देखील सहज होऊ लागले. स्वेरीत शिक्षण घेतल्यामुळे माझे जीवनच बदलून गेले.’ असे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा आणि स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी देखील उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपला आत्मविश्वास कमी होऊ देवू नका. पुढील आयुष्याचे नियोजन या वयातच करून ठेवा, बदलत्या काळातील आव्हाने स्विकारून त्याचा पाठपुरावा करा. त्यासाठी अथक प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करणे अशक्य नाही. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण उत्तमरीत्या केले. सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांची मुक्त उधळण केली गेली. त्यात हिंदी-मराठी भाषेतील नव्या व जुन्या गाण्यांचा समावेश देखील होता. मिहीर देशपांडे यांनी संगीत साधनांसह केलेले हंसध्वनी लक्षवेधी ठरले. अगदी सूत्रसंचालनापासून ते विविध नाट्यछटा सादर करेपर्यंत संस्थेच्या नियमितच्या शिस्तीला कोणतीही बाधा न आणता विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख कलाविष्कार सादर केले.त्यात नेत्रदीपक विद्युत रोषणाई, कर्णमधुर संगीत यांच्या मिलापाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळच्या सत्रात पारंपारिक वेशभूषेमध्ये अनेकांनी शेतकरी, देशसेवेसाठी सदैव तैनात असलेले सैनिक, पारंपारिक सण यावर आधारित वेशभूषेने कॅम्पस बहरून गेला होता तर फिशपॉन्डमुळे प्रचंड हशा पिकल्या. बी. फार्मसीला राष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे व फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांचा सत्कार गव्हर्निंग बॉडीचे डॉ. भगनुरे, डॉ. खोमणे यांनी केला. यावेळी महाराष्ट्र पालक संघाचे आबासाहेब दैठणकर,सौ. गिरीजा रेपाळ, सौ. माळी, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, सौ. रोंगे, सौ बागल,  कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील,  विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्यासह इतर अधिष्ठाता,  विभागप्रमुख,  प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशांत पाटील, जितेंद्र पाटील, किशोरी सावंत, प्रा. यशपाल खेडकर व इतर विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies