शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये शालेय साहित्य वाटप. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 13, 2019

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये शालेय साहित्य वाटप.

माणदेश एक्सप्रेस 
प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  अकलूजमधील समता नगर येथील जिल्हा परिषद शाळा व यशवंतनगर मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे व जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत( वही)शालेय साहित्य वाटप करून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे-देशमुख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,बहुजन युवा ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे,सोमनाथ शेळके, बंडू कांबळे,पप्पू खाडे,राजू बागवान,आदिनाथ काकडे,आनंद मिसाळ,रफिक मुलाणी,साहिल अडगळे, शब्बीर शेख इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise