जि.प.शाळा माळखांबीचे क्रिडा स्पर्धेत यश. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 2, 2019

जि.प.शाळा माळखांबीचे क्रिडा स्पर्धेत यश.
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : वाघोली ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे झालेल्या छोटा गट मोठा गट बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा माळखांबीच्या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये बुद्धिबळ प्रथम क्रमांक मुले, प्रणित प्रवीण कळसाइत तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर मुलीमध्ये द्वितीय क्रमांक श्रुती वसंत बाबर, 100 मीटर धावणे द्वितीय  क्रमांक आदित्य बजरंग गुरव, 200  मीटर धावणे तृतीय क्रमांक  ऋतुराज कांबळे यांनी यशस्वी कामगिरी केली. तर खोखो मुले लहान गट उपविजेता लंगडी लहान गट मुले उपविजेता ठरले आहेत. विजेत्यांना माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून मेडल प्रदान करण्यात आले.
यशस्वी मुलांना माळखांबी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रकुमार क्षीरसागर, शिक्षक दत्तात्रय लोखंडे, अशोक पाटील, ज्ञानेश्वर कोष्टी, दत्तात्रय कांबळे, सौ.सुनीता पवार, प्रवीण कळसाइत विष्णू जायभाय यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Advertise