मालेवाडीच्या शेतकऱ्यांचा विम्याची प्रलंबित प्रश्न पंकजाताई मुंडे यांनी तातडीने मार्गी लावला ; शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पिक विमा- सरपंच सौ.वैशाली बदने. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

मालेवाडीच्या शेतकऱ्यांचा विम्याची प्रलंबित प्रश्न पंकजाताई मुंडे यांनी तातडीने मार्गी लावला ; शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पिक विमा- सरपंच सौ.वैशाली बदने.

             
माणदेश एक्सप्रेस न्युज 
परळी वैजनाथ प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे मालेवाडी येथील खरीप हंगामातील पीक विम्यापासून वंचित राहावे लागले होते. सरपंच व ग्रामस्थांनी पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली. पंकजाताई मुंडे यांनी ओरिएंटल कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून व सर्व त्रुटी दूर करून विम्याची रक्कम तातडीने जमा करावी अशा सूचना केल्या.  शेतकऱ्यांचा विम्याची प्रलंबित प्रश्न त्यांनी तातडीने मार्गी लावला. शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात खात्यावर जमा होणार आहे. सरपंच सौ.वैशाली बदने व शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांनीच मिळवुन दिल्याच्या भावना व्यक्त केल्या.

      तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातील शेतकर्यांईना खरीप पिक विमा 2018 चा लाभ मिळाला नाही. परंतु मालेवाडी ग्रामस्थ अद्याप यापासुन वंचित आहेत. सरपंच सौ.वैशाली भुराज बदने य पिक विमा तात्काळ वाटप करण्याची मागणी ऑरिएंटल इंन्शुरन्स लि.कंपनीला पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी निवेदनाद्वारे केली आहे. पुर्वी मालेवाडी हे गाव अंबाजोगाई तालुक्यात येत होते. परंतु आता परळी तालुक्यात आले आहे. खरीप पिक विमा 2018 च्या शेतकर्यांतना बँकद्वारे वाटप करुन लाभ मिळाला नाही.  मालेवाडी गावातील शेतकर्यां ना अद्याप पिक विम्याच्या अनुदानाचा लाभ मिळाला नाही. ऑरिएंटल विमा कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांना सरपंच सौ.वैशाली बदने यांनी एका निवेदनाद्वारे खरीप पिक विमा 2018 चा लाभ देण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. 
          मालेवाडी येथील सरपंच व  शेतक-यांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन खरीप हंगामातील पीक विमा अद्याप पर्यंत मिळाला नाही अशी मागणी करून हा प्रश्न मार्गी लावावा. पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ या प्रश्नांवर कारवाई करत पुणे येथील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून लवकरात लवकर विम्याचा प्रश्न निकाली काढावा आणि संबंधित शेतक-यांच्या बॅंक खात्यात विम्याची रक्कम जमा करावा अशा सुचना दिल्या. आता यामुळे मालेवाडी येथील शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यांामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून, पंकजाताई मुंडे यांनीच आपल्याला न्याय मिळवुन दिल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.  यावेळी सरपंच वैशाली बदने, भुराज बदने उपसरपंच आदीनाथ बदने, भरत बदने, सदस्य वामन कातकडे, धोंडिबा गुट्टे, सुभाष कसबे, पाटलोबा बदने, ज्ञानेश्वर बदने, बाबासाहेब बदने, संजय राठोड व शेतकरी आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Advertise