ओएलएक्स डॉट कॉम वर डॉक्टरची झाली फसवणूक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 19, 2019

ओएलएक्स डॉट कॉम वर डॉक्टरची झाली फसवणूक.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : ओएलएक्स डॉट कॉम या वेबसाईटवर ती वाहनांची जाहिरात पाहून एका ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ओएलएक्स डॉट कॉम या वेबसाईटवर यामाहा आरडी ३५० मो.साय.यु.एस.आय-३५८७ या वाहनाचे जाहिरात पाहून जाहिरातीमध्ये या वाहनाचे मालक यांनी आरोपी भीमाला गोपाल सरकार रा.१०१ भरमापूर बकाली जलपायगुडी पश्चिंबंगल, यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या गाडीची किंमत एक लाख पंचवीस हजार रुपयाचे सांगितले. तेव्हा फिर्यादी डॉक्टर संदीप शंकराव आडके ( वय-५० ) व्यवसाय डॉक्टर रा.१/१ पी आर के हॉस्पिटल उत्तर सदर बाजार सोलापूर यांनी आरोपीचे एचडीएफसी बँक खाते क्रमांक घेऊन जलपायगुडी शाखा पश्चिम बंगाल या खात्यावर या खात्यावर एकूण १ लाख १८ हजार रुपये आरटीजीएस केले. व फिर्यादीस यामाहा आरडी ३५० मोटरसायकल यु.एस.आय.३५८७ या गाडीचे डिलेव्हरी न देता फसवणूक केली.याबाबत आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise