माळशिरस पंचायत समितीने आणला राज्यात सर्वाधिक निधी : आ. राम सातपुते; डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मंजूर कामांचे लाभार्थींना पत्र वाटप . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

माळशिरस पंचायत समितीने आणला राज्यात सर्वाधिक निधी : आ. राम सातपुते; डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मंजूर कामांचे लाभार्थींना पत्र वाटप .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस पंचायत समितीने गेल्या अडीच वर्षात राज्यात सर्वाधिक निधी आणून ग्रामीण विकासाला गती दिली व सहकार महर्षींचे विकासाचे स्वप्न साकार केले असे मत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले. 
माळशिरस पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या तालुक्यातील ३७ लाभार्थी यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व मोटर पंपसाठी मंजूर झालेल्या  सुमारे १ कोटी ९३ लाख ६० हजार रुपयांच्या मंजुरी पत्राचे वाटप माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या समारंभास शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील,  सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन ॲड प्रकाश पाटील,  श्री.शंकर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन ॲड मिलींद कुलकर्णी, माजी सभापती बाळासाहेब होले, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, काका मोटे, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब सरगर, लक्ष्मण गोरड, सचिन रणवरे, लक्ष्मण पवार, हरिभाऊ मगर, केशव कदम, विष्णूपंत केमकर,   जि.प. सदस्य अरुण तोडकर, सुनंदा फुले,  साक्षी सोरटे, लक्ष्मण भानवसे, प्रताप पाटील, मानसिंग  मोहिते, फातिमा शेख, शोभा साठे, आरती मगर, दादा ठवरे, नामदेव ठवरे, जालिंदर फुले यांच्यासह सरपंच व लाभार्थी उपस्थित होते.
प्रारंभी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ॲड. प्रकाश पाटील, काका मोटे, गणपतराव वाघमोडे आदीनी आपले विचार मांडले तर आभार गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise