जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पलूस/प्रतिनिधी : सांगली येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, समाजकल्याण अधिकारी  राधाकिसन देवडे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पाटील, मुख्याध्यापक आदी नागरीक उपस्थित होते.
 सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दिव्यांग प्रवर्गातील मुकबधिर, अंध, मतिमंद या प्रवर्गातील ३२ गाण्याचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले.  सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सामाजिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक गौरव पुरस्कार व आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार, सेवा निवृत्त पुरस्कार देण्यात आले.  मुकबधिर विद्यामंदिर पलूस या शाळेनी छत्तीसगड राज्यातील संतोषी या आदिवासी मुलगीचे ‘भूक से हुई मौत’ या बातमीवर गाणे सादर केले. भात मिळाला नाही व रेशन दुकानदाराने आधार कार्ड नसल्याने रेशन दिले नाही व शेवटी मुलीचा मृत्यू झाला. असे मुकबधिर मुलांनी गाणे सादर केले. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी कौतुक केले. नुत्य शिक्षक सोनू वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. मुंबई मधील २००६  साली घडलेली रेल्वे बाँम्ब स्फोट दक्षशतवादी हल्ला या बातमीवर पलूस येथील अंध मुलींनी गाणे सादर केले.

1 comment:

  1. ३ डिसेंबर अपंग दिन निमित्त मतिमंद मुलांची निवासी शाळा जुळेवाडी ता.कराड जि.सातारा येथे मुलांचा सभागी होते अपंग दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे क्रिडा राबविले यामध्ये धावणे , गोळा फेक , लिंबू चमच्या, लांबउडी हे घेण्यात आले या वेळी शाळांचे मुख्याध्यापक तसेच कर्मचारी उपस्थित होत

    ReplyDelete

Advertise