दिघंचीत मोटारसायकलची चोरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

दिघंचीत मोटारसायकलची चोरी.


माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी/प्रतिनिधी :  दिघंची येथे अज्ञात चोरट्यांनी होंडा स्प्लेंडर या कंपनीची मोटर सायकल चोरून नेली. उदनवाडी ता. सांगोला येथील अमोल गोपाळ वाघमारे याने याबाबत आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. दि. 29  नोव्हेंबर रोजी दिघंची येथील मुक्ताई स्कूल येथे उभी केलेली मोटरसायकल एम.एच.४५-एएक्स ७०११ अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीची गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सदरची मोटारसायकल ही काळ्या रंगाची राखाडी पट्टा असलेली होंडा स्प्लेंडर प्रो कंपनीची आहे. अधिक तपास पीएसआय भोते करीत आहेत.
तर आटपाडी येथे दि. 19 नोव्हेंबर रोजी नानासो तातोबा देशमुख रा. विठ्ठलापूर यांचीही मोटरसायकल गाडी नंबर एमएच.४५ आर ७४९८  आटपाडी येथील गुलाल कलेक्शन येथून चोरीस गेली आहे. आटपाडीत सातत्याने मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वाहनचालक भयभीत झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise