एकदिवशीय कार्यकर्ता अभ्यास वर्ग शिबीर संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 31, 2019

एकदिवशीय कार्यकर्ता अभ्यास वर्ग शिबीर संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सोलापूर शाखा माळशिरसचे रौप्य महोत्सवानिमित्त एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे  उद्घाटन गोपाळराव देव प्रशाला माळशिरस येथे शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन अॅड. मिलिंद कुलकर्णी, सचिव मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी भालचंद्र पाठक,  प्रांत सदस्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद बडवे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, विकास धांईजे, गणराव वाघमोडे यांच्या हस्ते  करण्यात आले. 
या अभ्यास वर्गासाठी जिल्ह्यातून व तालुक्यातून असंख्य  ग्राहक उपस्थित होते. यावेळी अॅड.मिलिंद कुलकर्णी, पीएसाय शेंळके, विभाग संघटक दिलीप भोसले, सचिव मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी भालचंद्र पाठक,  प्रांत सदस्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सुभाष सरदेशमुख, सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद अॅड. तुषार झेंडे पाटील, सदानंद बडवे सह अनेक मान्यवरांनी अभ्यास वर्गासाठी आलेल्या ग्राहकांसमोर आपापले मनोगत व्यक्त केले.  अत्यंत आत्मविश्वासाने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उभे राहिले पाहिजे. ग्राहकांचे असे शोषण होऊ नये म्हणूनच शोषणमुक्त समाज निर्माण करणे हे महान उद्दिष्ट अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने स्वीकारले त्यामुळेच आज पुण्यातील व देशातील असंख्य नामवंत व्यक्ती ग्राहक पंचायतीमध्ये सहभागी होत गेल्या आणि बघता बघता ग्राहक पंचायतीचे पुण्यात सुरू असलेले रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि त्यातूनच ही चळवळ व संघटना देशव्यापी झाली. असे मनोगत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच ग्राहकांची कर्तव्ये व मुलभूत हक्क यावर विचारमंथन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विनोद भरते,  शशिकांत हरिदास, सदानंद बडवे, उपेंद्र केसकर व वामनभाऊ वाघमोडे,  संजय हुलगे सतसेच अभ्यास वर्गासाठी जिल्ह्यातून तालुक्यातून असंख्यने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस तालुका पदाधिकारी ग्राहक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise